
नाशिक (प्रतिनिधी ) राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्याचा पाचवा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. ९ जुन २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी, जि. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला असून, कार्यकमाचे उद्घाटक नागपुर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले आहेत तर कार्यकमाचे नियोजित अध्यक्ष राज्यशास्त्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार, आहेत. समवेत प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. विनय चव्हाण आहेत. राज्यशास्त्र विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त प्राध्यापक वृंदाचा सत्कार सोहळा, परिषदेच्या आगामी वाटचालीसाठी नियोजन बैठक आदींचे आयोजन करण्यात आले आहे, तरी नाशिक विभाग व नाशिक जिल्हा राज्यशास्त्र परिषदेच्या पदाधिकारी, सदस्य, सेवानिवृत प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासक, विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन राज्यशास्त्र परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब सोनवणे व विभागीय महासचिव प्रा. अमोल अहिरे यांनी केले आहे.
