
वावी(. शब्दांकन – सौ. प्रज्ञा राजेंद्रकुमार व्यवहारे) वावी येथे पार पडला अभिनव, आदर्श, अनुकरणीय अभिष्टचिंतन सोहळा-वावी तालुका सिन्नर येथे रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले श्री. कारभारी वेलजाळी सर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त व सौ. कल्पलता कारभारी वेलजाळी ताई यांच्या पासष्टी निमित्त १ जून २०२५ रोजी अभिष्टचिंतन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत साई शर्वरी लॉन्सला दिमाखात पार पडला.

यावेळी कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत श्री. राजेंद्रकुमार व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचा जीवनपथ रांगोळी व फुलांच्या सहाय्याने तयार केलेला होता त्यावरून सरांना व ताईंना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने व्यासपीठावर नेले. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रांजली संदीप गीते व चि. प्रणव राजेंद्रकुमार व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रज्ञा राजेंद्रकुमार व्यवहारे यांनी केले. अभिष्टचिंतनाच्या सुरुवातीला औक्षण करून फेटे घालून श्री वेलजाळी सरांची ग्रंथ तुला करण्यात आली. या ग्रंथांमध्ये- कथा, कादंबऱ्या, नाट्यसंग्रह, बौद्धिक पुस्तके, ललित ग्रंथ, धार्मिक ग्रंथ ,वैचारिक ग्रंथ अशी असंख्य सरांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तके जमा झालीत.

सरांच्या मित्रमंडळीने, विद्यार्थ्यांनी पोस्टद्वारे, कुरियर द्वारे पुस्तके पाठवली.. एकूण ग्रंथ संख्या साडेतीनशे पर्यंत गेली बऱ्याच जणांनी वाचनालयासाठी आर्थिक मदतही दिली व वाचनालयाच्या वैभवात आणखी भर घातली. इलाहीबक्ष शेख यांनी त्यांचे वडील कै. हाजी नबाब भाई शेख यांच्या स्मरणार्थ तसेच विघ्नहर्ता नागरी पतसंस्था सिन्नर यांनी वाचनालयास कपाट भेट दिले. श्री. सुनील रघुनाथ यादव यांनी श्री. वेलजाळी सर व वेलजाळी ताई यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाचनालयास एक सुंदर, देखणा ऍक्रेलिकचा लेक्चर स्टॅन्ड भेट म्हणून दिला.

. नंतर “समर्पण” या गौरव ग्रंथाचे प्रास्ताविक सौ. सोनाली तुकाराम सोनवणे यांनी केले. सरांच्या प्रेमाखातर ५९ जणांनी लिहिलेल्या आपल्या भावना त्यात व्यक्त केलेल्या तसेच त्यात सरांचेही मनोगत असलेला ‘समर्पण’ हा ग्रंथ प्रकाशित केला. वेलजाळी दांपत्याच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. ह. भ.प. सचिन महाराज पवार, ह .भ. प. काशिनाथ महाराज पोमनर, ह.भ.प. खरात महाराज, डॉ. गलांडे (कवी), राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रवक्ते नामदेवराव कोतवाल, मा. संतोष घोटेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिर्डी, इलाहीबक्ष शेख (परशराम पतसंस्थेचे चेअरमन, वावी ग्रामपंचायत माजी सदस्य, तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक), प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे, कोसाका चे संचालक अरुण चंद्रे सर, श्री. नंदकिशोर गायकवाड (रयत बँक सातारा चेअरमन), महामित्र दत्ता वायचळे, श्री हासे सर, श्री अर्जुन वेलजाळी, सत्कारमूर्ती श्री. व सौ. वेलजाळी, तसेच पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रसाद वेलजाळी, सौ. प्रज्ञा ,सौ.प्रांजली, सौ. सोनाली, सौ.रूपाली आदींच्या उपस्थितीत समर्पण गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला.

वरील सर्व मान्यवरांचे सौ. रूपाली अजित पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे…अहो,वधू-वराची मिळणी!जैसी वऱ्हाडीया लुगडी लेणी!!(अध्याय ११ ओवी क्रमांक ३. ज्ञानेश्वरी) वरील उक्तीप्रमाणे कार्यक्रमातील ज्येष्ठ मंडळींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पेढे, समर्पण ग्रंथ प्रत देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. ताईंची पेढे तुला केली त्यावेळी राजुर येथून कंदी पेढे मागविले होते. जेवणाच्या सर्व पंगतीमध्ये मुक्तपणे पेढे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात विलास खांडेकर पंढरपूर, रामदास निकुंभ अंमळनेर, सरांचे पन्नास वर्षांपूर्वीचे सहकारी, संगमनेर कॉलेज, कांदिवली कॉलेज येथील कॉलेज मित्र हेही उपस्थित होते. सरांनी व ताईंनी मोठा मित्रपरिवार जमविलेला आहे यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात सर्वप्रथम मुख्य भाषण झाले ते ह. भ. प. सचिन महाराज पवार (संत साहित्याचे गाढे अभ्यासक, वारकरी दर्पण मासिकाचे संपादक) यांनी आपल्या भाषणातून सरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली

त्यावेळी बोलताना ते म्हणाले सरांकडे पाहून असे वाटायचे सर छत्रपतींच्या वंशातील असावेत आणि ताईंचे जिजा हे नाव सार्थक वाटायचे. सरांचे माझ्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्यामुळे मी आजीवन त्यांचा ऋणी राहीन या भावना व्यक्त करून त्यांनी उभयतांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या. ह. भ. प. काशिनाथ महाराज पोमनर, ज्योतिष विशारद यांनी आपल्या भाषणातून सत्कारमूर्तींविषयी गौरव उद्गार काढले, ते म्हणाले कर्तुत्व दातृत्व कर्तव्य यांचा मेळ घालून समाज घडवताना ताईंनी मुलांना घडविले त्याचा परिपाक म्हणूनच आज या मुलांनी हा अभिष्टचिंतन सोहळा घडवून मातापित्यांना या पृथ्वीतलावर जणू स्वर्ग सुखचं दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार असे उत्सव कुणाचेही होत नाही, कर्तव्यातून संस्कार देऊन समाज हिताबरोबरच आपली पुढील पिढी संस्कारक्षम बनविल्यामुळेच आज आपण या स्वर्गसुखाचा अनुभव देणाऱ्या अमृत महोत्सव सोहळ्याचा अनुभव घेत आहोत. ह भ प खरात महाराज ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी साऱ्या जगाचा कारभार पाहणाऱ्या कारभाऱ्याचे भरभरून कौतुक केले त्यांचे आपण आजीवन विद्यार्थी असल्याचे त्यांनीही कबूल केले व सरांच्या या गगनाला भिडणाऱ्या वेलीचा ताईंना वटवृक्ष म्हटले आहे. व कर्तबगार पुरुष यामागे उभे राहणाऱ्या ताईंचं मन भरून कौतुक केलं व उभयतांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या माननीय उदय सांगळे यांनीही श्री. वेल जाळी सर व सौ.वेलजाळी ताई यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या. नंदकिशोर गायकवाड यांनी सरांना 75 वर्षांचा तरुण म्हटले आहे. तर अविनाश ढोली, माधवी पाटील, रामदास निकुंभ, संजय गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांनी उभयतांना शुभेच्छा देऊन त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचे अनेक किस्से सांगितले डॉक्टर अत्रे यांनीही सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या कृष्णा घुमरे, दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, भाऊसाहेब पवार, शरद व्यवहारे, जी एल पवार, प्राध्यापक वाजे सर, पत्रकार प्रभाकर बेलोटे, मा.सतीश घोटेकर , अविनाश ढोली,माधवी पाटील आदि अनेक मान्यवरांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विषयी गौरव उद्गार काढले. शेवटी सरांचे मुख्य भाषण झाले त्यात त्यांनी आपल्या सौभाग्यवती कल्पनाताईंचे मनमुराद स्तुती केली तसेच त्यांच्या नावातील व घराच्या नावातील तसेच आडनावातील साम्यही स्पष्ट केले व त्यांच्या विषयी प्रेमळ असा ऋणनिर्देश व्यक्त केलाहा सर्व कार्यक्रम तसेच ग्रंथ निर्मितीची सर्व कामे सरांच्या मुलांनीच केले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन हे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अतिशय उत्तम रित्या पार पाडले. सर्वत्र या अभिष्टचिंतन सोहळ्याचे कौतुक होत आहे असा आगळावेगळा कार्यक्रम पाहून उपस्थित अगदी भारावून गेले व सर्वत्र या कार्यक्रमाबद्दल चर्चा चालू आहे. त्यातील ग्रंथ निर्मिती ग्रंथ प्रकाशन ग्रंथ तुला पेढे तुला मान्यवरांचे अभिष्टचिंतन हे नाविन्यपूर्ण आकर्षण ठरले शाहू फुले आंबेडकर चळवळीतील अभ्यासू साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांना अभिवादन केले त्यानंतर श्री. प्रसाद कल्पलता कारभारी वेलजाळी यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर सरांच्या कर्ण मधुर आवाजातील पसायदानाने या आगळ्यावेगळ्या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली व सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
शब्दांकन – सौ. प्रज्ञा राजेंद्रकुमार व्यवहारे
