
नांदगाव ( प्रतिनिधी )दि ५ जुन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित व्ही. जे हायस्कूल नांदगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरित सेनेमार्फत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मा. मुख्याध्याक श्री.लक्ष्मी्कांत ठाकरे सर, वनविभागाचे अधिकारी मा.श्री. संतोष शिंदे सर, उपमुख्याध्यापक मा. श्री.मिलिंद श्रीवास्तव सर तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. वनाधिकारी श्री. संतोष शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपनाचे महत्व सांगत त्याची निगा राखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. व्यासपीठावरून बोलताना मा. मुख्याध्यापकांनी जागतिक तापमानाला नियंत्रिक करणारा एक प्रभारी घटक म्हणून वृक्षाकडे

आपण बघितले पाहिजे आणि जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि एकत्रित प्रयत्न करायला हवेत, शाळेच्या आवाराबरोबरच आपल्या घराजवळ, शेतात मोकळ्या जागेवर वृक्षांची लागवड करून त्याची निगा राखूया आणि पर्यावरणाचे जतन करण्यासंदर्भात प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण क
