
मखमलाबाद विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शालेय इको क्लब तर्फे ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य विमल रायते, पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.योगिता मोगल यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले.विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व माहीत व्हावे यासाठी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना पर्यावरणावर आधारित घोषवाक्य तयार करण्यास सांगितले.कार्यक्रमास एन.सी. सी.ऑफिसर दयाराम मुठाळ, ज्येष्ठ शिक्षक बाळु पवार,योगिता मोगल,मनिषा कारे,अश्विनी पाटील,चैताली मोगल,चैताली पिंगळे,यादव तांबे,भाऊसाहेब ढिकले, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

