
नाशिक(प्रतिनिधी ) – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय पंचकनाशिकरोड मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती बीपी उकिरडे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व महत्त्व व पर्यावरण आरोग्य इत्यादी विषयी सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.आजचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीमती सरला बोरसे मॅडम आपले मनोगत व्यक्त केले.पर्यावरण दिन साजरा करण्याची आवश्यकता आपणास का आहे याबाबत तिने सखोल शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर विद्यालयाचे श्रीमती खैरनार मॅडम यांनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.दरवर्षी होणारे हवामान बदल,तापमान वाढ, जंगलतोड यासारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पर्यावरण दिवसाची संकल्पना अस्तित्वात आली.खरे पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत फार आधीपासून पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची जाणीव रुजलेली आहे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने विद्यालयात वृक्ष लागवड सोमनाथ सहाणे (माऊली) व सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब वाळेकर व विद्यार्थी शिक्षकांच्या हस्तेकरण्यात आली सदर केले.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.पी.उकिरडे म्हणाल्या दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे,पर्यावरण विषयक समस्या,पर्यावरणाचे संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक आहे.मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.त्यामुळेच पर्यावरण दिन हा साजरा करणे ही काळाची गरज झाली आहे. या पर्यावरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला पर्यावरण विज्ञान,पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान या तीन भागात अभ्यास करावा लागेल.

सूत्रसंचालन सरला बोरसे मॅडमतर आभार श्रीमती खैरनार मॅडममानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
