
नांदगांव..( मारुती जगधने) नांदगांव येथे चोरांनी सिद्धिविनायक नगर आणि सुयोग कॉलनी या मध्यवर्ती वस्तीतून बंद घराची कडी कोयंडा कुलप तोडून चोरी केली या घटनेमध्ये चोरट्यांनी सोने चांदी आणि रोकड कॅश असे लाखो रुपयांची चोरी केलेली आहे,नांदगाव बस स्थानक व शहरालगत ही घटना घडली पगारे यांच्या बंद घराच्या तीन दरवाजांचे कटरने कोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील सर्व सामानाची उचक पाचक करून घरातील सुमारे १० हजार रू रोकड व १० भार चांदी आदी मौल्यवान वस्तु चोरी करून पसार झाले त्यानंतर सुयोग कॉलनी मध्ये देखील चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलपे तोडून आत प्रवेश करून उचकापाचक करून डोंगरे यांच्या घरातील दिडतोळा सोन, १ लाख रोख रक्कम,देवघरातील चांदीच्या देवाच्या मुर्त्या चांदीच्या साखळ्या आदी मौल्यवान वस्तू चोरट्यांनी मधुकर डोंगरे सुयोग कॉलनी मधून चोरी केलेले आहेत डोंगरे यांच्या मुलाने सकाळीच बँकेतून कॅश काढून घरी आणली होती आणि रात्री चोरांनी त्याच्यावर डल्ला मारला यादरम्यान देखील चोरट्यांनी घरातील वस्तूंची उचकपाचक केली आणि वस्तू घेऊन पसार झाले ही घटना तीन तारखेला मध्यरात्री घडली. या दरम्यान चोरट्यांनी घरातील चोरी करण्यापूर्वी बाजूच्या गल्लीतील सर्व घरांच्या कड्या बाहेरून बंद केल्या होत्या जेणेकरून कोणी आतून बाहेर येऊ नये व अशी चतराई चोरट्यांनी केली आणि चोरी करून पसार झाले. या दोन्ही घरांमधील नागरिक घरी नसल्यामुळे या चोऱ्या झाल्या आहेत एकंदरीत बंद घरांच्या चोऱ्या करण्यामध्ये चोर यशस्वी झाले आता चोरांचा तपास करणे पोलिसांना एक आव्हानच झाले आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती घटनेची दोन्ही व्यक्तींकडून नांदगांव पोलिसात तक्रार करण्यात आले आहे
