
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२७ वा दिवस आपल्याच वैयक्तिक मुक्तीकामनेने तुम्ही जर सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग? जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुक्तीवर देखील पाणी सोडण्याची तुमची तयारी आहे काय? तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहात हे लक्षात घ्या. थोर लोकांनी महान त्याग करावा व सामान्य जनांनी त्याची फळे उपभोगावीत या गोष्टीला साऱ्या जगाचा इतिहास साक्ष देईल. तुमच्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल, सर्वविजय प्रेम असेल, सर्वशक्तिमान पवित्र असेल तर अल्पकाळातच तुम्हाला यश मिळेल याची खात्री बाळगा.
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १५ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ५ जून २०२५
★ १७२३ जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एडम स्मित यांचा जन्मदिन
★ १९७३ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींचा स्मृतीदिन
★ जागतिक पर्यावरण दिन🌳🌳 झाडे लावा, झाडे वाचवा 🌳🌳
