
सिन्नर ( प्रतिनिधी )अमृत महोत्सव सोहळा सिन्नर येथे मिठे परिवारातर्फे त्यांच्या मातोश्री श्रीमती भिमाबाई बाळू मिठे यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सव ज्वाला माता लॉन्स या ठिकाणी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री राजाभाऊ वाजे हे होते. प्रमुख उपस्थितीत सिन्नर भूषण ह. भ. प.श्री एकनाथ महाराज गोळेसर, युवा नेते उदय भाऊ सांगळे, तसेच सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव लोंढे ,सेक्रेटरी श्री नामदेव लोणारे, तसेच ज्यांची अतिशय सुंदर अशी किर्तन सेवा झाली ते धर्माचार्य एडवोकेट शंकर महाराज शेवाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली.

किर्तन सेवेत शंकर महाराज शेवाळे यांनी अतिशय छान असे दाखले दिलेत , अशिक्षित आईने नवरा वारल्यानंतर एक मुलगी तीन मुले असा सर्व संसाररूपी गाडा हा कधी शेतमजुरी करून तर कधी वीड्या बांधून हाकला. मुलं शिकवली. त्यांच्यातला सगळ्यात लहान किरण मिठे हा शिक्षक बनवला. समाजाने आई मेल्यानंतर खूप मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा त्यांच्या जिवंतपणीच त्यांना आनंद होईल असे वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असे शेवाळे महाराज यांनी सांगितले. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव श्री नामदेव लोणारे यांनी आईला शुभेच्छा देताना त्यांनी संस्थेला जी देणगी दिली त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे अतिथी श्री उदय सांगळे यांनी मिठे परिवाराने जो स्तुत्य असा उपक्रम केला त्याचे कौतुक करून ज्या आईने अतिशय कष्टातून मुलांचा सांभाळ केला व त्यांना घडवले व त्या मुलांनीही त्या आईचा यथोचित असा अमृत महोत्सव सोहळा केला त्याबद्दल संपूर्ण मिठे परिवाराचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले की समाजात खूप धनवान लोक असतात पण त्यांचे आई-वडील हे वृद्धाश्रमात असतात. लोकांनी या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमातून बोध घेऊन आई-वडिलांची सेवा करावी. जिवंतपनी त्यांना आनंद होईल असे कार्यक्रम घ्यावेत .तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून मीठे कुटुंबाने पंढरपूर येथे जी सगर वंशीय जिरेमाळी समाजाची धर्मशाळा होत आहे त्यासाठी आणि सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी ज्या देणग्या दिल्या त्याबद्दल संपूर्ण मिठे कुटुंबाचे आभार मानून आईला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश मिठे,राजेंद्र मिठे सर,संजय मिठे,संतोष मिठे,विजय मिठे,किरण मिठे सर,रुपेश मिठे, अजय मिठे,आकाश मिठे, दिपक मिठे, देवेंद्र मिठे,मनोज महात्मे,शेखर गोळेसर, कल्पेश चव्हाण,गोकुळ लांडगे,राहुल जगताप,मनोज लोंढे,सार्थक गवळी आदींनी परिश्रम घेतले.
