
पिंपळगाव बसवंत( वार्ताहर ) तळागाळातल्या सर्व महिलांनी सर्वांगीण दृष्ट्या आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता ह्या धकाधकीच्या काळात आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही तर जीवन जगत असताना मानसिक शारीरिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध उपक्रमांतून महिलांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे.

असे प्रतिपादन जैन समाजाच्या अध्यक्षा अमिता जैन यांनी गिरजा महिला मंच निफाड तालुक्यातील इयत्ता दहावी ,बारावी विद्यार्थिनींच्या गुणगौरव प्रसंगी केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी अनेक महिलांच्या समस्या, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांना स्पर्श करत महिलांचे प्रश्न उपस्थित केले. परंतु किती संकट आले तरी महिलांनी खचून न जाता त्या संकटांना तोंड द्यायला हवे. गिरजा महिला मंचच्या वतीने महावीर विद्यालय लासलगाव या ठिकाणी गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी मुलींना प्रेरणा देण्यासाठी लासलगाव शहर प्रमुख पोलीस निरीक्षक मा. भास्कर शिंदे यांनी प्रतिपादन केले.जव्हेरीलाल ब्रम्हेचा , कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती सुवर्णाताई जगताप, महिला दक्षता समिती अध्यक्षा वेदिकाताई होळकर, जिल्हा अध्यक्ष शितल कुयटे, शान्तिलाल ब्रम्हेचा, मुकुंद ताकाटे, गिरणा गौरव प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेश पवार,रतन पिंगट आदींनी मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री चौधरी,आशा गोवर्धने आणि संगिता महाजन या ही या प्रसंगी उपस्थित होत्या.याप्रसंगी दहावी व बारावीच्या प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान गौरव चिन्ह, मानपत्र व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीजा महिला मंच निफाड च्या अध्यक्षा कल्पना माने,सौ.वैशाली शिंदे कार्याध्यक्षा श्रीमती कांचनमाला हुजरे सचिव,मनिषा निकम उपाध्यक्ष ,कल्पना गोसावी,मयुरी भडांगे,अर्चना परदेशी,संगिता आव्हाड,मनिषा वाघ,अर्चना डुमरे,अनिता देसाई,कविता चव्हाण ,नम्रता शिरसाठ,सिमा पाटील,संगिता सुरसे,सिंधू जाधव,आशा पगारे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कल्पना माने यांनी केले.सूत्रसंचालन सौ.वैशाली शिंदे व श्रीमती कांचनमाला हुजरे यांनी केले आभार मनिषा निकम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पिंपळगाव बसवंत येथील कै.बी.पी.पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स काॅलेज व्यवस्थापकीय संचालक मा.दिनेश अनारसे सर आणि मा.प्रा.प्रकाश भंडारे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच निफाड येथील मा.संतोष आहेरराव आणि मा.वेदीका ताई होळकर यांची ही मोलाची मदत मिळाली.
