
सिन्नर (प्रतिनिधी)०१ जून आदिवासी ह्रदयसम्राट माजी आदिवासी विकास मंत्री माजी विरोधी पक्षनेते निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांची ८४ वी जयंती महामित्र परिवार आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिन्नर व सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संघटना सिन्नर यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय मधुकर पिचड साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की, वंदनीय मधुकर पिचड साहेब यांचा जन्म एका कोळी महादेव आदिवासी कुटूंबात झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.१९७२ साली ते अहिल्या नगरचे जिल्हा परिषद सदस्य झाले.पुढे ते पंचायत समितीचे सभापती झाले.वंदनीय मधुकर पिचड साहेब हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी १९८० ते २००९ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे.ते अनेक वेळा सरकार मध्ये मंत्री राहिले होते.आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला.ते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते.माजी आदिवासी विकास मंत्री निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात आदिवासी समाज व इतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे.मग ते आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींसाठी वेगळं बजेट असो ,आदिवासी मध्ये बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी केलेला कायदा, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पेसा कायद्याची निर्मिती,आदिवासी विकास भवन, आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची निर्मिती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा व आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास पुढे आणण्याचं काम, भंडारदरा धरणाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नामकरण,शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणाची निर्मिती,अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्माण करण्याचं काम असे अनेक कामं मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आदिवासी विकास मंत्री निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांचं ०६ डिसेंबर रोजी प्रदिर्घ आजाराने ८४ व्या वर्षी दुःखद निधन झालं.त्यांचा अंत्यविधी ०७ डिसेंबर ला अकोले तालुक्यातील राजूर या त्यांच्या गावी झाला.ते निसर्गात विलीन झाले.त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसागर उसळला होता.या लोकनायकाचा मृत्यू ०६ डिसेंबर २०२४ रोजी झाला होता ते आदिवासींचे बाबासाहेबच म्हणता येतील अशा या जलनायकास विनम्र अभिवादन!या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे प्रास्ताविक रामु इदे तर आभार दत्ताभाऊ माळी यांनी मानले.यावेळी महामित्र दत्ता वायचळे, माजी नगरसेवक रुपेश मुठे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, बाळासाहेब मुठे, प्रकाश थोरात, निवृत्ती बोंबले,नकुल गोळेसर, दत्ताभाऊ माळी, राजेंद्र सालमुठे, बाळनाथ कार्ले आदि.उपस्थित होते.
