
सिन्नर ( प्रतिनिधी )सिन्नर नगरीत उभे राहिलेले वारकरी भवन आणि काही ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी परभणीहुन धर्मकीर्ती महाराज परभणीकर आज सिन्नरला आले होते.त्यांनी सर्वप्रथम लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली. खासदार साहेबांना ग्रंथ भेट दिला. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होन्याची त्यांची वृत्ती आणि त्यांच्या वारकरी समतावादी स्वभावाचे महाराजांनी कौतुक केले.खासदार राजाभाऊ वाजे यांनी उभारलेल्या वारकरी भवन येथे अहिल्यामाई होळकर यांच्या पुळ्याला हार अर्पण करून.

अहिल्यामाई होळकर यांच्या 300 वी जयंतीचे औचित्य साधत महामीत्र दत्ता वायचळे यांनी संपूर्ण वारकरी भवन फिरून दाखवले. व ऐतिहासिक संदर्भ देत माहिती दिली. या वारकरी भवनच्या सहभागृहाला अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. अहिल्यामाई होळकर यांनी 29 वर्षे घोड्यावर फिरून देशभर राज्यकारभार केला. त्यांनी स्त्रियांची फौज उभी केली. आडचनीत असणाऱ्या अनेक राजघराण्याना मदत करणाऱ्या लोकमता अहिल्यामाई होळकर होत्या. राष्ट्र उभारणीत अहिल्यामाई होळकर यांचे सर्वात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन धर्मकीर्ती महाराज यांनी केले. त्यानंतर जेस्ट लेखक साहित्यिक प्रा. पंडितराव देशमुख यांची भेट घेतली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर देशमुख यांचा प्रचंड व्यासंग आहे. त्याबद्दल महाराजांनी सविस्तर चर्चा केली.त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेतल्या.त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा ज्या ठिकाणी 8 महिने निवास होता, त्या ठिकाणाला म्हणजे चौदा चौकाच्या वाड्यातील मंदिराला महाराज व सर्व सहकारी यांनी भेट दिली. महाराजांच्या सोबत सिन्नर तालुक्यातील चापडगावचे जयराम सांगळे व महामीत्र दत्ता वायचाळे आदी उपस्थित होते.
