
नागापूर (प्रतिनिधी ) राजमाता, राजरागीणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने भाजपा नासिक उत्तर ग्रामीण जिल्हा, नांदगाव तालुका भाजपा *भालूर मंडलाच्या* वतीने नागापूर येथील प्राचीन श्री नागेश्वर महादेव मंदिर व परिसरात तालुका अध्यक्षा सौ मनिषाताई काकड, 108 रामचंद्र पुरीजी महाराज नागेश्वर मंदिर, रघुनाथ आण्णा सोमासे, डाॅ राजेंद्र आहेर, यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वछता अभियान व महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती विविध उपक्रम व कार्यक्रमांनी संपूर्ण देशभर साजरी होत असतांना नांदगाव तालुका भाजपा *भालूर मंडळीतर्फेही* विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात आले. नागेश्वर मंदिरात मंडल अध्यक्ष सौ मनिषाताई काकड व श्री भारत काकड सर यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकला. त्यांच्या राज्यकारभार पद्धतीची, उत्कृष्ट प्रशासक म्हणून केलेल्या कार्याची, मंदिर व घाट यांचा जिर्णोद्धार व पुनर्निर्माण या कार्याबद्दल माहिती सांगितली. अहिल्यादेवींचा हा वारसा राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार अहिल्याबाई होळकरांचा हा वारसा समृद्धपणे पुढे चालवित आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंदिर व परीसराची स्वच्छता करून मंदिरात महाआरती घेण्यात आली व शिवस्तोत्र पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस अशोक भाऊ आयनोर, माजी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, भारत काकड सर, तालुका उपाध्यक्ष प्रमोदभाऊ जाधव, सौ तृप्तीताई सोमासे, आनंदराव घाडगे, विजय भुसनर, डॉ सदगीर, संजय शिंदे, संजय जाधव, शानुभाऊ भालेराव, डॉ बी के आहेर, आप्पा मडके, बाजीराव दराडे, सुभाष पवार, विश्वनाथ थोरे, नितीन चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष मनेश नाईकवाडे, ज्ञानेश्वर व्हर्गळ, नारायण नागरे, रामकृष्ण हेंबाडे, रघुनाथ बेदाडे, नितीन डगळे, सोमनाथ शिंदे, बेदाडे मामा, हिरानाना उगले, कचरू सांगळे, राजेंद्र जाधव, राजू हेंबाडे, अमोल मेंगळ, विश्वनाथ पवार, वि का सो. चेअरमन गोविंद सोमासे, उत्तम उगले, भावराव मोरे, नानासाहेब सुर्यवंशी, सचिन थेटे, संजय सोनवणे यांचेसह बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
