
फलक रेखाटन – देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
दि.३१ मे २०२५, राजमाता ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज त्रिशताब्दी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या,भारतातील अनेक हिंदू मंदिरे,नादिघात बांधले,लोकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिकीकरण धोरण आखले. अनेक मंदिरांचा ,जिर्णोद्धार केला व धर्मशाळांचे निर्माण केले. अहिल्यादेवी होळकर या नारी सशक्तीकरण , हिंदू धर्म रक्षण कर्त्या व सुशासक होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंती निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
