
चांदवड(प्रतिनिधी ) चांदवड येथील होळकर वाडा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्धी जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या समारंभात सौ सुचेता पंकज खताळ अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंकज खताळ पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दहा हजार मोतीबिंदूंचे मोफत ऑपरेशन केले . उत्कृष्टआरोग्य सेवा व सामाजिक कार्य केल्याबद्दल आम्हा दोघांनचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराज श्रीमंत शिवाजी राव होळकर, युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर, शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादा भुसे साहेब, पणन मंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल साहेब, आ. सौ. चित्रा ताई वाघ यांच्यासह आमदार राहुल दादा आहेर तसेच आ. श्री. दिलीप काका बनकर, आ. श्री. नितीन पवार, श्री. भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री. शंकराव वाघ, श्री. सुनील बच्छाव, श्री.निलेश कचवे सर, प्रथम नगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल आदी उपस्थित होतो. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष, चांदवड श्री.मनोज शिंदे,भाजप तालुका अध्यक्ष, वडनेर भैरव श्री. संदीप काळे, भाजप तालुका अध्यक्ष, देवळा श्री.किशोर आहेर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, शिवसेना तालुका प्रमुख श्री.निलेश ढगे, संजय पाडवी यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन मार्गदर्शन आमदार राहुल दादा आहेर व अहिल्यादेवी समिती द्वारे करण्यात आले
