
नांदगाव (प्रतिनिधी,मुक्ता राम बागुल)नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव परिसरात दिनांक 29 मे 2025 रोजी गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास बोलेरो पिकपमध्ये सहा जनावरे कत्तरीसाठी घेऊन जाणारा बोलोरो पिकप सह ड्रायव्हर यास बजरंग दल व हिंदू समाज मित्र मंडळ बोलठाण आणि जातेगाव यांनी पकडला. सदर खबर त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर बोलोरो पिकप सह ड्रायव्हरला ताब्यात घेऊन नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शिवारातून दिनांक 29 मे 2025 रोजी गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास कत्तलीसाठी M.H.-20 DE -2875 बोलेरो पिकप हा 6 जनावरे घेऊन जात असताना जातेगाव व बोलठाण येथील बजरंग दल व हिंदू समाज मित्रपरिवार यांनी पकडला. याची खबर पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदरचा पिकप हा जातेगाव येथून बोलठाण पोलीस आऊट पोस्ट बोलठाण येथे आणण्यात आला. बोलेरो पिकपचा ड्रायव्हर आणि जनावरांनी भरलेला बोलेरो पिकप बोलठाण पोलीस औट पोस्ट येथून सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशन येथे नेण्यात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . मात्र जनावरे खरेदी करणारा अज्ञात व्यक्ती फरार झाला असून बुलेरो पिकप च्या ड्रायव्हरला नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत काय कारवाई करतात याकडे बजरंग दल व हिंदू समाज मित्र मंडळ यांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.
