
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१९ वा दिवस भारत पुन्हा उठेल संदेह नाही. पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने. विध्वंस, विनाश, द्वेषाचा झेंडा नाचवून नव्हे, तर शांती, प्रेम, सर्वांच्या कल्याणाची विजय पताका फडकवीत. चक्र आता फिरुन वर येत आहे. भारतातून पुन्हा एकदा नवचैतन्याचा, शक्तीचा, सामर्थ्याचा, आत्मविश्वासाचा प्रवाह वाहू लागला आहे. समस्त भारतीयांमध्ये आता नवचैतन्य जागृत झालं आहे. आपल्या मातृभूमीच्या उत्कर्षासाठी, पुनरुत्थानासाठी आता सारे सज्ज झाले आहेत. *स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २८ मे २०२५ ★ १८८३ थोर क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यीक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव) यांचा जन्मदिन.
★ १९०३ किर्लोस्कर उद्योग समुहाचे प्रमुख मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
