
सिन्नर ( प्रतिनिधी )२७ मे २०२५ त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९० व्या स्मृतीदिनानिमित्त सिन्नर येथे महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की,आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमधील अनेक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये रमाबाईनी भाग घेतला डाँ.आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या बहुजना व दलित समाजातील लोक रमाबाई आई साहेब आणि डाँ. आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणून संबोधतात,रमाबाई तीन ते चार किमी अंतरावर जाऊन शेण आणत असे. शेणाच्या गोवऱ्या तयार करुन विकत असे. जवळपासच्या परिसरातील स्ञिया म्हणत की बॅरिस्टरची पत्नी असुनही तिने आपल्या डोक्यावर गाईचे शेण घेतले आहे.त्यावर रमाबाई म्हणायच्या,घरकाम करण्यात कायलाज.माता रमाई ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या त्यामुळे बाबासाहेबांना आपले ध्येय पुर्ण करता आले.माता रमाई यांचा मृत्यू २७ मे १९३५ रोजी झाला. अशा या महान त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…राजेंद्र शेजवळ, जगन्नाथ कटारनवरे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जिवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामुदायिक स्तुतीसुमनाने विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे प्रास्ताविक रामु इदे तर आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, माजी नगरसेवक श्रीकांत जाधव, अजय साळवे, राजेंद्र शेजवळ, जगन्नाथ कटारनवरे, अनिल शिंदे, गणेश गोळेसर,राज सोनवणे, विशाल उन्हवणे,राज शिरसाठ, आकाश चव्हाण, राजेंद्र जगताप, लक्ष्मण माळी, अंबादास बाकळे, विशाल कुंवर, संदिप जाधव, धम:पाल शिरसाठ, आत्माराम माळी, प्रकाश शिरसाठ आदि. उपस्थित होते.
