
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१८ वा दिवस* मनुष्याच्या ठिकाणी जे दैवत्व आहे त्यावर श्रद्धा ठेवा. त्याच्या ठिकाणी काही दोष असतील, त्याच्या हातून चुका होतील, तो कदाचित क्रूर आणि खुळ्या समजुतींना चिटकून बसलेला असेल. परंतु हे सारे काही त्याचा मूळ स्वभाव नव्हे. त्याच्यापुढे श्रेष्ठ आदर्श ठेवले गेले नाहीत म्हणून तो हीन राहिला आहे. तुम्ही त्याला सत्यदर्शन घडवा. तेथेच तुमच्या कामाची परिसमाप्ती झाली. सत्याच्या दर्शनाने मनुष्यातील दिव्यत्व प्रकट झालेच पाहिजे. या देशाचे अध्यात्मिक पुनरूत्थान करण्याचा हाच मार्ग आहे. परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहे त्यावर टीकास्त्र सोडणे यातुन काहीच साधणार नाही. स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ६ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २७ मे २०२५ ★ अमावस्या – गंगा दशहरारंभ
★ करिदीन
★ १९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा स्मृतीदिन
★ १९५१ मुंबई स्थित तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
★ १९६४ आधुनिक भारताचे शिल्पकार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा स्मृतीदिन.
★ १९९४ महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा स्मृतिदिन.
