
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१६ वा दिवस आपल्या पूर्वजांवरील श्रद्धा तुमच्या रक्तात भिनून जावो. तुमच्या जीवनाचे ते एक अंगच बनून जावो व तिच्यामुळे तुमच्याद्वारे समस्त जगताचा उद्धार होवो, हीच मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करेन. आपल्या पूर्वजांचा दैदिप्त्यमान इतिहास, आपल्या राष्ट्राचे जीवित कार्य कोणते आहे, आपल्या राष्ट्राची मुलतत्वे, विधात्याने आपल्याला कोणत्या कार्यासाठी नियुक्त केले आहे. अन्य राष्ट्रांच्या समवेत आपल्या राष्ट्राला कोणते स्थान प्राप्त करावयाचे आहे, या सर्व बाबी आपल्या देशबांधवांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तर आणि तरच आपल्या राष्ट्राची प्रगती होऊन पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. उच्च स्थानावर विराजमान होईल.
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ४ जेष्ठ शके १९४७*
★ वैशाख वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २५ मे २०२५ ★ १८९५ इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्मदिन
★ १९९८ लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा स्मृतीदिन
★ २००५ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व माजी केंद्रीय मंत्री सुनिल दत्त यांचा स्मृतीदिन.
