
सिन्नर (प्रतिनिधी ) क्रांतिकारक शहिद भीमा नाईक जयंती व राजीव गांधी स्मृतिदिन डाॅ जयंत नारळीकर आदरांजली* महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन *कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे *क्रांतीकारक भीमा नायक* . निमारच्या भिल्लांचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी १८५७ च्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या उठावात भिल्ल, भिलाला, मंडोई आणि नाईक जमातींमधून लोकांना आणून ब्रिटिशविरोधी शक्ती उभारली आणि तात्या टोपे यांच्याशी सहकार्य केले. ज्या वेळी (१८५७ च्या क्रांती) तात्या टोपे निमारला आले तेव्हा त्यांची भेट भीमा नायक यांच्याशी झाली. त्या काळात भीमाने त्यांना नर्मदा नदी ओलांडण्यास मदत केली. त्यांना निमारचा जंगलात पळून गेला.

त्यांच्याच एका माणसाच्या हेरगिरीच्या आधारे, १८६१ मध्ये ब्रिटिश त्याला त्याच्या जंगलातील लपण्याच्या ठिकाणाहून अटक करण्यात यशस्वी झाले. त्याला दोषी ठरवण्यात आले, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमान बेटांच्या सेल्युलर तुरुंगात पाठवण्यात आले. २९ डिसेंबर १८७६ रोजी अंदमान बेटांवर त्याचा मृत्यू झाला.अशा शहिद भीमा नायक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच *माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांची आजस्मृतिदिनानिमित्त*…तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं त्यांनी कायम स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. राजीव गांधी यांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाबाबततंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन, भारताला आधुनिक जगाची कवाडं उघडून देणाऱ्या माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांनी भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला..राजीव गांधी यांनी घेतलेले हे निर्णय आपण कधीच विसरु शकणार नाही अशा माजी पंतप्रधान राजीव गांधी या विनम्र अभिवादन *ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांचं दु:खद निधन!*ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर झोपेत (१९ मे रात्री ) यांचे निधन झाले. डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते, तर विज्ञान लेखकही होते. त्यांनी भूमिकांसाठी ओळखले जात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरल्या आहेत.डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे. महाराष्ट्र अशा या महान शास्त्रझाल भारत देश मुकला आहे त्यांच्या जाण्याने खगोल अंतराळ संशोधन जगात मोठी पोकळी निर्माण झाली त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली *सुत्रसंचलन किरण मुठे,प्रास्ताविक विजय मुठे,आभार आकाश धोंगडे* यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,किरण मुठे,आकाश धोंगडे ,प्रभाकर गाडेकर, शरद जाधव, प्रकाश गुंजाळ, राहुल वाघमारे,मुना गुंजाळ,लखन पाचोरे आदी.उपस्थित होते
