
नाशिक:- (प्रतिनिधी ) प्रशांतदादा हिरे माध्यमिक विद्यालययाचे दहावीच्या बॅचचे विद्यार्थी शाळेत पुन्हा एकदा एकत्र आले. सुट्टीचे दिवस असूनही शाळेची घंटा झाली. रांगेत उभे राहून प्रार्थनेला विद्यार्थी सज्ज झाले. रांगेत आपण ज्या वर्गात बसत होतो त्यावेळेस आपण कोणत्या जागेवर बसत होतो ती ती जागा निवडली. शिक्षक विद्यार्थी एकत्र आले अन शाळकरी कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यमान शाळेचे मुख्याध्यापक पृथ्वीराज मगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले माजी मुख्याध्यापक योगाचार्य अशोक पाटील हे अध्यक्षस्थानी होते. श्रीमती बच्छाव, श्रीमती बेडसे, चव्हाणके डी .एम.( योगायोगाने यांचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा दिल्या) यांनी मनोगत व्यक्त केले.प्राथमिक चे मुख्याध्यापक सोपान निकम, कार्यक्रमासाठी हजर होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये वैभव ढिकले, विवेक दुकळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व धुरा सांभाळली. हिमाली जोशी, स्वाती हासे, नलिनी घुले, यांनी वतीने मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. शाळेचे ऋण म्हणून पाच माजी विद्यार्थ्यांनी हजार रुपये देणगी दिली प्रेरणादायी असा कार्यक्रम झाला. शेवटी एस .एम. पाटील यांनी आभार मानले. सगळ्यांनी हॉटेल संस्कृतीमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला व त्याचबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रमही केले.
