
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१२ वा दिवस* आपल्याला ऋषी मुनींनी जे शिकविले ती महान तत्वे होती. मात्र आता ऋषी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांची मते देखील पडद्याआड गेली आहेत. आता आपणच स्वतः ऋषी झाले पाहिजे. जे कोणी श्रेष्ठ, महान, थोर पुरुष अवतार होऊन गेलेत, ती सर्व तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसेच होती. केवळ पुस्तकी शिक्षणाने काय साध्य होईल? तासनतास निव्वळ ध्यानधारणेने काय होईल? नुसत्या मंत्र, तंत्र, जप अनुष्ठाने काय साध्य होईल? आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे. आपण स्वतः ती साधना केली पाहिजे. ते महान तत्व, महान ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे. आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३० वैशाख शके १९४७*
★ वैशाख वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २० मे २०२५
★ १७६६ इंदूर राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचा स्मृतीदिन
★ १८५० आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिन
★ १९३२ लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक हवामान विज्ञान दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
