
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.३५ टक्के लागला असून १२५ प्रविष्ट पैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्रथम – संस्कृती दुकळे (९१.१६) द्वितीय – साहिल शिंदे (९०.४०) द्वितीय – जयश्री दुकळे (९०.४०) तृतीय साक्षी देवरे (८९.८०) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासुताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुशय चिंतले.
