
ओझर: दि.१५ (वार्ताहर )एसएससी परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कार्तिकी मोरे, प्रज्ञा वाव्हळे, मयुरी पाटील, प्रीती बाविस्कर, अंकिता वाघ, अक्षदा भडके या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते गुणपत्रक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पालक, ग्रंथपाल अनिता भंडारे सेवक अशोक हळदे पुंडलिक जाधव माणिक बोरस्ते लक्ष्मण नेवकर आदी उपस्थित होते.
