
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०७ वा दिवस
मनःसंयमाची पहिली पायरी म्हणजे काही वेळ एका जागी चूप बसून राहणे आणि मनाला हवे तसे भरकटू देणे होय. मन सदा चंचल असते त्याला सदाच उकळ्या फुटत असतात तुम्ही फक्त स्थिर बसा आणि त्याच्या चेष्टा साक्षीभावाने शांतपणे पहात राहा, मनाला अगदी मोकळे सोडा, त्याला अगदी येथेच्छ भरकटू द्या. तुमच्या मनात इतके गलिच्छ, इतके ओंगळ विचार येऊ शकतात याचे तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. परंतु वर सांगितल्याप्रमाणे स्थिर बसून म्हणाला या सर्व माकडचेष्टा साक्षीभावाने शांतपणे अवलोकीत गेल्यास तुम्हाला आढळून येईल की तुमच्या मनाचा उनाडपणा रोज हळूहळू कमी होत आहे. मन अधिकाधिक स्थिरावत आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ वैशाख शके १९४७
★ वैशाख वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुकुवार दि. १५ मे २०२५
★ १८१७ बंगाल प्रांतातील थोर समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
★ १९०७ क्रांतीकारक सुखदेव थापर यांचा जन्मदिन
★ १९९३ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा स्मृतिदिन.
★ २००४ नाशिकचे कवी, लोकशाहीर वामन दादा कर्डक पुण्यतिथी.
★ जागतिक कुटुंब दिन…
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
