




नाशिक रोड (प्रतिनिधी ) जनता विद्यालय पंचक,नाशिकरोड एस.एस.सी परीक्षा 2025 चा निकाल 91.48% लागला.फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय पंचक नाशिक रोड या विद्यालयाचा निकाल 91.48% लागला.माध्यमिक शालांत परीक्षेत एकुण 94 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी 1. गौड राज सुखराम – ४३९ गुण (८७.८०%)2. कुमावत समाधान तुकाराम – ४३५ गुण (८७.००%)3. मुळे तेजस महादेव – ४३१+3 गुण (८६.८०%)4. वाढवे पौर्णिमा श्रीराम – ४३३ गुण (८६.६०%)5. विश्वकर्मा निलेश शिवकुमार – ४३० गुण (८६ .००%) मविप्र संस्थेचे सरचिटणीस माननीय अॅड. नितीन भाऊ ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले व नाशिक चे संचालक रमेश (आबा )पिंगळे व शहर संचालक अॅड. लक्ष्मणराव लांडगे शालेय समितीचे अध्यक्ष अॅड सुनिल(अण्णा )कारभारी बोराडे व शालेय समितीचे सर्व सदस्य आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.पी.उकिरडे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक यांचेअभिनंदन केले ….
