


ओझर(प्रतिनिधी): दि.१३ वार्ताहर मराठा विद्या प्रसारक समाजाचे, माधवराव बोरस्ते विद्यालयाचाएस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी /मार्च २०२५चा निकाल ९५:६५% लागला. एकूण प्रविष्ट विद्यार्थी ३४७, तर उत्तीर्ण विद्यार्थी ३३१, अनुत्तीर्ण १६ याप्रमाणे निकाल लागला. विद्यालयातील पहिले पाच गुणवंत विद्यार्थी , प्रथम कार्तिकी सुनील मोरे गुण ४६३– ९४.००% द्वितीय प्रज्ञा सदू वाव्हळे ४६२–९२.४०% तृतीय मयुरी अशोक पाटील ४५०–९२.००% चतुर्थ प्रीती गणेश बाविस्कर ४५९–९१.८०% अंकिता सुभाष वाघ ४५४–९१.८०% तर अक्षदा भास्कर भडके ४५२–९१.००% पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती डी बी मोगल संचालक शिवाजी गडाख संचालिका शोभा बोरस्ते शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे सर्व सदस्य मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
