




नाशिकरोड 🙁 प्रतिनिधी)- नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील नासाका माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९६.५५ टक्के लागला आहे. वेदिका भाऊसाहेब शिंदे ही ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तनिष्का संजय आडके (९३ टक्के) ही द्वितीय आणि गणेश मनोहर सानप (९१.४० टक्के) हा तृतीय आले आहे. तर ९०.४० टक्के गुण मिळवून सुजल संजय शिंदे आणि ८८ टक्के गुण मिळवून सारंग नवनाथ मुंजे अनुक्रमे चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार आणि माजी मुख्याध्यापक सुनील बर्वे, शिक्षक-कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
