
सिन्नर (प्रतिनिधी) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पजलीने मानवंदन दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की गौतम (बुद्ध )यांचा जन्म पोर्णिमेच्य़ा दिवशी झाला म्हणून त्यांच्या जन्म दिवसाला बुद्ध पोर्णिमा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. बुद्ध पोर्णिमा हा सण वैशाखी पोर्णिमेला साजरा केला जातो.दुःख निवारण्याचे मार्ग जगाला सगळ्यात प्रथम सांगणारे, शांतिदूत आणि सत्यशोधक, भारत भूमीच्या कणाकणात आजही वास करून असलेले, जगात ज्यांच्या नावामुळे आजही भारताची ओळख आहे , कर्मकांड नाकारणारे, धर्माची व धर्मग्रंथांची चिकित्सा करायला सांगणारे पहिले धम्म संस्थापक, बुद्धीवर विश्वास ठेवणारे, आपल्या अनुयायांना आपल्या विचारांची चिकित्सा करायला लावणारे, देव- स्वर्ग-नर्क आत्मा- पुनर्जन्म यांना नाकारून सत्कर्मांची शिकवण देणारे,*जगन्नाथ कटारनवरे म्हणाले की* ज्यांच्या जन्मामुळे ही भारत भूमी पावन झालेली आहे असे तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. त्यात त्यांनी जगाला पाच पंचशीले दिली. हिंसा करू नका. चोरी करू नका , व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका, ही पाच पंचतत्वे त्यांनी जगाला दिली. *सागर भालेराव म्हणाले की* हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. *धम्मपाल शिरसाठ व प्रकाश शिरसाठ यांनी समुदायक बुध्द वंदना घेतली व पुजा धिवरे,कुलदीप धिवरे यांनी खीर दान केले सुञसंचलन डाॅ.आनंद सानप प्रास्ताविक विजय मुठे आभार वैशाली आढांगळे* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,जगन्नाथ कटारनवरे, सागर भालेराव डाॅ.आनंद सानप, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,धम्मपाल शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, पुजा धिवरे,कुलदीप धिवरे, सोमनाथ गुळवे,दिगंबर खरे,अनिल भाटजीरे,शिवाजी कुल्थे राहुल जाधव, देविदास खंडागळे,आदी उपस्थित होते
