
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०२ वा दिवस नराचा नारायण होणे म्हणजे मानव तत्त्वाची परिपूर्ण अवस्था होय. मनुष्याच्या ठिकाणी जन्मताच वास करून असलेले पूर्णत्व आकारास आणणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या योगे त्याच्या सामाजिक अस्तित्वातून प्रकट होणारे सद्गुण, सदाचार, सद् विचार हर्ष व आनंद प्राप्त करून घेणे, सुनियोजित व कार्यक्षम अशा शिक्षण पद्धतीतून नवसमाजाची निर्मिती होणे. त्यांच्यात धर्म, करुणा, वास्यल्य, आत्मसाक्षात्कार, दैवी आनंदाच्या प्राप्तीची उच्चतम अवस्था गाठणे. आपल्या देशातील दीनदुबळ्या गरीब लोकांविषयी करुणा त्यांच्या उपाशी तोंडात भाकरीचा घास भरवण्याची वृत्ती सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याची तळमळ समस्त मानव जातीवर प्रेम आपल्या देशावर अत्यंतिक प्रेम ही मानवाची परिपूर्ण अवस्था म्हणावी लागेल. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २० वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १० मे २०२५
★ १९१८ रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्मदिन
★ १९९८ पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा स्मृतीदिन
★ २००१ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन.
