


जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेचे सर्व १२१ प्रविष्ट विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा : प्रथम – स्वाती कराडे (८३.८३) प्रथम – निकिता ढोणे (८३.८३) द्वितीय – शर्वरी बागुल (८१. १७) तर कला शाखेचे १३३ प्रविष्ट पैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखा : प्रथम – भाग्यश्री शेरमाळे (७७.००) द्वितीय – काजल बिडगर (७६.१७) तृतीय अजय रायते (७५.१७) काजल बिडगर या विद्यार्थिनीने राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक ९३ गुण पटकावलेत. तर चार विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक प्रत्येकी ९१ गुण मिळालेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासुताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुशय चिंतले.
