.

–सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९६ वा दिवस* आध्यात्मिकता, शास्त्र, युध्द, राजकारण, काव्य, कला, साहित्य, संगीत आदी क्षेत्रात जगज्जेता ठरणाऱ्या वीरांना सगळे जग मानवंदना देते. थोर पुरुष म्हटले की इतिहासात हेच महान पुरुष डोळ्यापुढे उभे राहतात. मात्र यांच्या यशासाठी त्या काळात ज्यांनी थोडीही कुरकुर न करता कर्तव्यदक्षपणे रात्रंदिवस खूप काबाडकष्ट केले, मेहनत केली, अशा गरीब, अज्ञानी, उपेक्षित वर्गातील लोकांची दखल इतिहासात कुठेही घेतली जात नाही. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर १४ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ४ मे २०२५
★१९८९ भारतातील ग्रामपंचायत व पंचायत समिती यामध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
★ १९९५ बाॅम्बे ऐवजी मुंबई शब्द वापरला जावा, असा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
★ कोळसा कामगार दिन.
