
नाशिक ( प्रतिनिधी)..नाशिक येथे आयोजित दिनांक एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक आयोध्या रोईंग क्लब मध्ये घेण्यात ओलंपियन श्री.दत्तू भोकनळ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतातील पहिलाच रोइंग सेमिनार नाशिक येथे आयोजित करण्यात आला प्रचंड असा प्रतिसाद या सेमिनारला मिळाल्यामुळे रोइंग बद्दलची जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याच्या ध्येयाने उद्दिष्टाने तसेच जास्तीत जास्त खेळाडू रोइंग या खेळाकडे कसे वळतील यासाठी आपल्या महाराष्ट्रातील पहिले रोइंग मधील पहिलाच अर्जुन पुरस्कार विजेते ओलंपियन दत्तू भोकनळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सदर सेमिनारसाठी नाशिक मधील रोईंग या खेळात काम केलेले प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होते. अश्विनी भोकनळ हेमंत पाटील सुनील धोंडगे नामदेव काकड अक्षय कातड महेंद्र कातड सागर काकड भागवत झाल्टे या सर्व उपस्थित मान्यवरांनी पालकांना खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्व खेळाडूंनी दत्तूभाऊ भोकनळ यांचे आभार मानले
