
सिन्नर. ( प्रतिनिधी )२ मे २०२५ सिन्नर शहरातील तहसील कार्यालया समोरील क्रांतीस्थळावरील आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक ह्या महापुरुषांच्या त्रिशिल्प स्थळी व राष्ट्रपिता महत्मा फुले स्मारक सिन्नर बस स्थानक जवळ महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतिने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १७७ व्या बलिदान निमित्ताने यांच्या त्रिशिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे महादेव कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालविणे, बंदुकीने निशाणा साधणे, घोडेस्वारी करणे यांत तरबेज होते.

राघोजींचे संघटन कौशल्य चांगले होते. त्यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्यायी अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्याची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद व दस्तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना २ मे १८४८ रोजी ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य युद्धात व अन्याय आत्याचारा विरुद्धच्या लढ्यात आद्य.क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे खूप मोठे योगदान होते अशा क्रांतिकारकास विनम्र अभिवादन.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कटरनवरे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार नवशीराम साबळे यांनी मानले. यावेळी महामित्र अध्यक्ष दत्ता वायचळे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे व जगन्नाथ कटारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे कटरनवरे,नवशीराम साबळे, भानुदास मुठे सुनिल सातभाई सुनिल साळवी किरण मुठे,अभिषेक लहामटे,अनुज गायकवाड, गौरव घोटेकर,राजू खताळे,निवृत्ती शिंदे, शिवाजी भाटजिरे,सागर विघे,सखाराम पवार,भिमराव कटारे,लहानू आहरे,समाज बांधव उपस्थित होते.
