
सिन्नर,( प्रतिनिधी ) येथील कामगार कल्याण केंद्रात पार पडलेल्या साहित्यिकांच्या बैठकीत ‘साहित्य भारती’च्या सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, अध्यक्षपदी देव थोरात, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब भोरकडे तर उपाध्यक्षपदी मोहन वाघचौरे व वृक्षमित्र विष्णू वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी सौ. सुनीता वाळुंज संघटकपदी सौ. सुनीता सांगळे, प्रसिद्धीप्रमुखपदी जालिंदर डावरे यांची नियुक्ती करण्यात आली, कार्यकारिणीत सदस्यपदी उत्तम खताळे, सौ. जयश्री चव्हाणके, सौ. प्रियांका वाबळे,योगेश थोरात, अमोल चिने, नागेश सोंडकर , सोमनाथ एखंडे, अंकुर काळे, सौ. रोहिणी मिठे, शाहीर स्वप्निल डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली, मार्गदर्शक म्हणून प्रा. राजाराम मुंगसे, रवींद्र कांगणे, मनीषा उगले, किरण भावसार, प्रा. जावेद शेख काम पाहणार आहेत. ‘साहित्य भारती’ ही भारतभर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेची शाखा असून ती महाराष्ट्रात ‘साहित्य भारती’ नावाने काम करते. मराठी साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार, विविध साहित्यिक उपक्रम, स्पर्धा आणि प्रकाशने आदी कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केले जातात.या माध्यमातून सर्व साहित्यिकांना मोठ्या प्रमाणात साहित्य सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार असून नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
