
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९१ वा दिवस
युरोपातील अनेक शहरातून भ्रमण करीत असता तेथील गरिबांना देखील लाभणाऱ्या सुखसोयींची व शिक्षणाचे जेव्हा मी निरीक्षण केले तेव्हा माझ्या मनचक्षूंसमोर आपल्या देशातील गरीबांच्या परिस्थितीचे चित्र उभे राहीले आणि माझ्या नेत्रातून घळघळ अश्रू वाहू लागले. हे एवढे अंतर असण्याचे कारण काय? त्यावर उत्तर मिळाले 'शिक्षण'. शिक्षणामुळे त्यांच्या हृदयात आत्मविश्वास उत्पन्न होत आहे आणि आत्मविश्वासामुळे त्यांच्यातील सुप्त ईश्वरत्व जागृत होत आहे, तर उलट आपल्यातील ईश्वरत्व मात्र हळूहळू सुप्त होत आहे. शेकडो वर्षे आपण त्यांना शिक्षणाच्या मौलिक अधिकारांपासून वंचित ठेवले. ज्ञानाच्या प्रकाशापासून दूर ठेवले हे मोठे घोर पाप आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ वैशाख शके १९४७
★ वैशाख शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५
★ परशुराम जयंती
★ १८४८ सुप्रसिध्द भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचा जन्मदिन.
★ १९६० हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा म्हणून अथक परिश्रम घेणारे हिंदी कवी पंडित बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचा स्मृतीदिन.
★ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
★ राष्ट्रीय कला दिन.


