
चांदवड ( प्रतिनिधी). राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. *नाशिक जिल्हा अध्यक्ष कपिल भाऊ तेलुरे यांचे नेतृत्वाखाली चांदवड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रतिष्ठित व्यावसायिक महावीर जी संकलेचा यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी महावीर संकलेचा यांची चांदवड तालुका अध्यक्षपदी निवड करून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र प्रदान केले.
