
मनमाड (प्रतिनिधी) आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे महाराष्ट्र व्हिजी एन.टी. समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने मनमाड शहरात आयोजित भव्य शोभा यात्रेसाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले यावेळी भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी माजी नगराध्यक्ष बबलू पाटील भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ॳॅड. योगेश मिसर,भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर शिवसेना संघटक सुभाष माळवदकर अनंता भामरे आदी उपस्थित होते.
