
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८९ वा दिवस मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून ती कार्यान्वित करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण या संधीच्या द्वारे तुम्ही उदात्त आणि उन्नत होत असता. स्वतःच्या क्षमता विकसित करीत असतात. जर तुम्ही मिळालेली संधी गमावली तर तुम्ही भविष्यात पश्चाताप कराल. संधी तुमची गुणवत्ता वाढवते, सदाचारी बनवते, विशेष दर्जा प्राप्त करून देते. अशा संधी तुम्हाला खंबीर बनवतात, अधिकाधिक जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता आणि सामर्थ्य प्रदान करतात. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ वैशाख शके १९४७*
★ चैत्र अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २७ एप्रिल २०२५
★ १८५४ भारतात पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
★ १८७८ कलकत्ता उच्च न्यायालयाने भारतातील स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची कायद्याने मंजूरी दिली.
★ १८८३ जेष्ठ नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जन्मदिन
★ १९८० पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा स्मृतीदिन.


