
ओझर:(प्रतिनिधी ) राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा नाशिक अंतर्गत या वर्षाचा “*चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पून:विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा* “” या घोषवाक्या नुसार ओझर गावात टाऊनशिप शेजवळवाडी, सोनेवाडी उर्दू शाळा, भगतसिंगनगर, दात्याने, जिव्हाळे थेरगाव, दीक्षी येथे गावातील जेष्ठ नागरिक, आशा, आरोग्य कर्मचारी सुपरवायजर, सर्वांनी एकत्र येत रॅली काढली. गावात गप्पी मासे सोडून त्याचे महत्व हिवताप निरीक्षक रवींद्र देवरे यांनी सांगितले त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार, आरोग्य सहयिका भारती कदम, प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी पल्लवी कुलकर्णी, फार्मसी ऑफिसर सुमती ठाकूर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रतिभा जुनागडे, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी रिद्धी पाटील, कावेरी कदम, संगीता गाडे, आरोग्य सेविका बागुल मनीषा, दीपिका भामरे, करिष्मा काकड, प्रतिभा चौधरी, कारले सिस्टर, स्नेहल पवार, दवणे सिस्टर, नंदा देवरे, केरूळकर सिस्टर, आरोग्य सेवक सतीश गारोळे प्रवीण राऊत, प्रशांत बिहाडे, मोतीराम थोरे, जयवंत राऊत, कमलेश पवार,उपकेंद्र 3 चे उमेश रामटेके , समीर मुरुडेश्वर, विकास पीठे, अविनाश घोडविंदे तसेच सविता ढवळे, भारती लिलके, स्वाती पवार, मेघा वाघ, सुनीता निर्भवणे, निर्मला जाधव, उन्हवणे ताई, चित्रा सुतार, पूनम गांगुर्डे, सुनीता तोंगारे, प्रा आ के स्वाती सिस्टर, सोनाली सिस्टर, सुवर्णा सिस्टर, वळवी सिस्टर, लभडे सिस्टर , मोरे दीपाली, प्रशिक बागुल यांनी प्रभातफेरी काढून किमान आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला पाहिजे. प्रत्येक घरी गप्पी मासे सोडण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी घेतला.हिवतापावर सामुदायिक शपथ घेऊन हिवताप होऊ न देण्याचा संकल्प केला. पाण्याच्या टाक्यांवर झाकणे ठेवा, पाणी उघड्यावर ठेऊ नका अशी माहिती रॅलीत देण्यात आली. रॅलीसाठी सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी ताई, हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
