
नाशिक (प्रतिनिधी ) स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांचे प्रथम पुण्यस्मरण नुकतेच पिंपळे येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झालेपुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन केसरी ह भ प प्रकाश महाराज आव्हाड यांचे सुश्राव्य अशी कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांचे शुभहस्ते स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ बिन्नर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अर्थात भव्य अशा स्मारकाचे अनावरण करण्यात आले तसेच स्वर्गीय मारुती शेठ विन्नर ट्रस्टच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ही या दिवशी संपन्न झाला तसेच स्वर्गीय मारुती शेठ विन्नर यांचे नावाने सार्वजनिक वाचनालयाचेही नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वर्गीय मारुती शेठ विन्नर ट्रस्टच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिर नवजीवन रक्तपेढी यांचे सहकार्याने भरविण्यात आले

यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान केले यामध्ये श्री राजेंद्र बिन्नर संतोष बिन्नर बन्सी बिन्नर दीपक चव्हाण दिलीप बिन्नर संतोष गिरी अशोक बिन्नर संजय बिन्नर अशा अनेक जणांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे यानुसार रक्तदानही केले तसेच स्वर्गीय मारुती शेठ बिन्नर ट्रस्टच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर यांचे सौजन्याने शाळेतील गरीब होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले तसेच वाचनालयास श्री भानुदास मुरलीधर पानसरे यांचे कडून एक लाख एक हजार रुपयाची देणगी देण्यात आली तसेच अनेक दानशूरांनी वाचनालयास रोख स्वरूपात व पुस्तक रूपाने देणगी दिली यात विशेष करून कैलास शेठ किसन बिन्नर यांनी 11000 रुपये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन मुकेश सदगीर यांनी 11 हजार रुपये पोपटराव अंबुजी सदगीर यांनी दहा हजार रुपये रोख देणगी वाचनालयास दिली यावेळी

परिसरातील तसेच विनर कुटुंबियांचे नातेवाईक तसेच स्वर्गीय मारुती शेठ बिन्नर यांचे वर प्रेम करणारे अनेक चाहते या कार्यक्रमास सुमारे पाच ते सहा हजार जनसमुदाय उपस्थित होता यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री राजाभाऊ वाजे अकोले विधानसभेचे सदस्य आमदार डॉक्टर किरणजी लहामटे दिनकर अण्णा पाटील सिन्नरचे युवा नेते उदय भाऊ सांगळे जि प चे माजी सदस्य राजेंद्र चव्हाणके पोपटशेठ दराडे कानडे समाजाचे अध्यक्ष बबनराव सदगीर सुभाष कुंभार महामित्र दत्ताजी वायचळे कळवणचे तहसीलदार कैलास चावडे साहेब उपजिल्हाधिकारी श्री नितीन सदगीर साहेब श्री गोपाल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर टी के सदगीर नामदेव शेठ शिंदे सरपंच ठाणगाव हिवरे पिंपळे टेंभुरवाडी धुळवड पाडळी या गावचे सरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते तसेच डॉक्टर डी व्ही रुपवते बाळासाहेब पानसरे कल्याण विठ्ठल राजे उगले माजी नगराध्यक्ष देवराम शेठ सदगीर मनमाड सिल्वर लोटस स्कूल चे अध्यक्ष दिलीप शेठ बिन्नर इंजिनीयर समाधान गायकवाड तसेच सिन्नर तालुक्यातील अनेक बिल्डर्स इंजिनियर व ह भ प मदन महाराज वरपे ह भ प तुकाराम महाराज चोखंडे रोटरी क्लब चे असिस्टंट गव्हर्नर श्री बाळासाहेब सदगीर रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश जोंधळे माजी अध्यक्ष सतीश नेहे किरण वाघ बहिरू शेठ बेनके दगडू हळकुंडे विठ्ठल शेठ बेनके इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी स्मारकासाठी श्री तानाजी फकीरा घुगे व कारभारी मुरलीधर घुगे यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व बिन्नर कुटुंबांकडून ऋण व्यक्त करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी शोक संदेश पर मनोगत व्यक्त केली यामध्ये विशेष करून श्री दत्ताजी वायचळे महामित्र सिन्नर बाळासाहेब पानसरे कैलास चावडे साहेब सुभाष कुंभार राजेंद्र चव्हाणके चोखंडे महाराज मदन महाराज वरपे इंजिनियर समाधान गायकवाड सिन्नर चे युवा नेते उदय भाऊ सांगळे नाशिक लोकसभा लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र सदगीर सर यांनी केले शेवटी सर्व मान्यवरांनी स्नेहभोजन केले व कार्यक्रमाची सांगता झाली
