
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी)- नवनाथ गायकर यांजकडुन——– वारकरी संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसर व सगतच्या ब्रम्हगिरीच्या पायथ्याला हागणदरीने वेढा दिलेला आहे.परिसरात यामुळे दुर्गंधी व घाणीचा प्रादुर्भाव होत असुन यामुळे भाविकाचें आरोग्य धोक्यात आहे.दुर्दैवाने स्वच्छतेच्या या गंभीर प्रश्नाकडे ना संस्थान विश्वस्ताचे लक्ष आहे, ना त्रंबकेश्वर नगरपालिकेचे लक्ष आहे. भारतातील बारा महान ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे त्रंबकराज ज्योतिर्लिंग, संपुर्ण भारतात शांतीसाठीचा नागबली विधी व वारकरी संप्रदायाचे उगमस्थान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थान आदी महात्म्य या क्षेत्राचे आहे. वारकरी संप्रदायाचे हे अत्यंत श्रद्धेचे ठिकाण असुन येथे सातत्याने शेकडो भाविकाचीं ये जा सुरु असते.

सतत किर्तन सोहळे व धार्मिक कार्याने संतश्रेष्ठ निवृतीनाथ समाधी परिसर भाविकानीं गजबजलेला असतो.मात्र एवढी वर्दळ सातत्याने असतानांही आजही या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा आहे.ये जा करणार्या भाविकानां नैसर्गिक विधीसाठी चक्क परिसरात उघडयावर जावे लागते हे दुर्दैवी आहे.यामुळे ब्रम्हगिरीचा पायथाही घाणीने बरबटलेला आहे. त्रंयबकेश्वर नगरपालिका प्रशासन व समाधी देवस्थान संस्थान विश्वस्त,पुजारी महंत हे सगळं उघडया डोळयानीं पहात असतात.या जबाबदार संस्था तथा व्यक्तीनां भाविकाच्यां आरोग्याबातही यत्किंचितही काहि वाटु नये याबाबत भाविक आश्चर्य व्यक्त करत आहे.या परिसरात घाणीने एवढे साम्राज्य पसरवले आहे कि यामुळे समाधी परिसरही अस्वच्छ झाला आहे. परिसरात यामुळे मच्छर व डासाचें थैमान असुन रात्री या परिसरात थांबणे अवघड आहे. संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरु आहे.मात्र ते ही अत्यंत संथगतीने सुरु असल्याबाबद भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.सगळयानां संधी, भाविकाचें काय ? संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज समाधी मंदिरावर शासन नियुक्त विश्वस्त समिती काम पाहते.या समितीवर राजकिय लागेबांधे असलेलीच मंडळी कारभारी असुन, सगळयानां अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी पदाची हाव असुन यासाठी सगळया विश्वस्तानीं वर्ष दोन वर्ष संधी प्रत्येकास देण्याची राजकिय मंडळी करतात तशी सोय करुन घेतली आहे. यामुळे देवस्थानही राजकारणापासुन वेगळे न ठेवण्याचे काम या विश्वस्त मंडळीनीं चालवलेय याबाबत भाविक नाराजी व्यक्त करत आहे.
