
नाशिक:- (प्रतिनिधी)_सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर गिरी यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर आणि समन्वयक संजय आहेर यांनी दिली._* *_अध्यक्ष मधुकर गिरी यांच्यासह सोमनाथ साखरे, ॲड.मिलिंद चिंधडे (उपाध्यक्ष), अलका दराडे (कार्यवाह), मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (सरचिटणीस), दत्तात्रय कोठावदे (सचिव) या पदाधिकाऱ्यांसह सदस्य म्हणून तु.सी.ढिकले, अशोक पाटील, रमेश देसले, दतात्रय दाणी, शरद पवार, अर्जुन वेलजाळी, सुनंदा पाटील, वैजयंती सिन्नरकर, मुक्ता चिंधडे यांची आणि स्मारक प्रतिनिधी विजय राऊत, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार यांचीही निवड करण्यात आली. समन्वयक म्हणून सलग दुसऱ्यांदा संजय आहेर कार्य करणार आहेत._* *_गेल्या दीड वर्षांपासून नाशिक येथे ‘पुस्तकावर बोलू काही’ या राज्यातील अभिनव या उपक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील विविध साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हुतात्मा स्मारक येथे ऐसपैस गप्पांचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत सुमारे १३१ साहित्यिक या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपल्या पुस्तकावर ऐसपैस गप्पा केल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उतम कांबळे, बी.जी. वाघ, प्रा.सुमती पवार, डॉ.बी.जी.शेखर पाटील, वसंत खैरनार, प्रकाश होळकर, माजी आ.नानासाहेब बोरस्ते, विवेक उगलमुगले, डॉ.दिलीप धोंडगे, डॉ.एकनाथ पगार, प्रा.लक्ष्मण महाडिक, डॉ.सीताराम कोल्हे, प्रा.गंगाधर आहिरे आदिंसह अनेक साहित्यिक आपल्या साहित्यकृतीवर व्यक्त झाले आहेत._* *_पुढील पाच वर्ष अविरत भरणारा हा अक्षरयज्ञ २६ फेब्रुवारी, २०२९ पर्यंत सुरू राहणार असल्याचे नियोजन झाल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. नवीन कार्यकारी मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे._*
