
जळगाव निंबायती (वार्ताहर) नांदगाव तालुक्यातील पांझणदेव येथील ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक, नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय जयश्री प्रभाकर बच्छाव यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उच्च विद्याविभूषित पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी समिती अध्यक्ष किरण पगारे, उपाध्यक्ष आकाश पानपाटील, सचिव समाधान पगारे, कोषाध्यक्ष गोरख पगारे, संस्थेचे अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील , जि प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता काकड, गावातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संजय बच्छाव यांनी १९ पदव्या, नेट -सेट सह ६ विषयात पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांनी हिवाळी व उन्हाळी सत्रात ४४ वेळेस विद्यापीठीय परीक्षा दिली आहे. तसेच त्यांचे मराठी विषयात पी. एचडीसाठी संशोधन कार्य सुरू आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस अशोक डघळे पाटील, मोहन कदम ,अनिल गोरे ,सचिन अहिरे, रवींद्र गायकवाड ,बापू पगारे शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यानी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
