
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८४ वा दिवस मुलांनी अगदी किशोरावस्थेपासून उज्वल, चारित्र्यसंपन्न दिव्यवलयी व्यक्तींच्या सानिध्यात राहिले पाहिजे. सर्वोच्च शिक्षणाचे जिवंत उदाहरण नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. खोटे बोलणे हे पाप आहे, असेन नुसते वाचून, ऐकून उपयोग नाही, तर त्याचा प्रत्यय त्यांना आला पाहिजे. ज्यांच्या ठायी श्रद्धा व विश्वास नाही तो खोटे बोलणारच. आपल्या देशात नेहमी चारित्र्यसंपन्न, त्यागी सत् पुरुषच ज्ञानदानाचे कार्य करीत आले आहेत. ज्ञानदानाचे कार्य जोपर्यंत शीलवान, व्यासंगी, निःस्वार्थी, त्यागी लोकांकडून होत होते, तोपर्यंतच भारताचे भविष्य उज्ज्वल होते. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २ वैशाख शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २२ एप्रिल २०२५
★ जागतिक वसुंधरा दिन
★ १८१२ भारताचा ब्रिटिश गव्हर्नर, ज्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापन करुन ३४०० किमी लांबीचे रस्ते निर्माण केले, रेल्वे, टपाल व तार सेवा सुरू करणारे लार्ड जेम्स अँन्ड्रयू ब्राऊन रंमसे डलहौसी यांचा जन्मदिन
★ १८७० रशियन राज्यक्रांतीचे नेते, क्रांतीकारक ब्लादिमीर लेनिन यांचा जन्मदिन.
