
नांदगाव.( प्रतिनिधी). मविप्रं समाज नाशिकचे नांदगाव येथील संचालक अमित बोरसे यांचे मार्गदर्शन खाली व महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे अध्यक्षते खाली महाविद्यालयीन समितीची सहविचार सभा संपन्न होऊन,नांदगाव महाविद्यालयाचे विकासा चे दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. .नूतन प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी सर्वांचे स्वागत केले. मविप्रंचे नांदगाव संचालक श्री.अमित बोरसे यांना लोकमत वृत्त्तपत्र समुहा तर्फे लोकनेता पुरस्कार मिळाल्या.बद्दल त्यांचा या सहविचार सभेत विशेष सत्कार करण्यात आला..

सभेचे संचलन उप प्राचार्य मराठे सर यांनी केले. सभेत विद्यार्थि गुणवत्ता वाढबरोबरच कमवा व शिका योजना, विद्यार्थि कल्याणकारी विकास योजनांवर चर्चा करण्यात आली. शासना चे विविध कल्याणकारी योजना पासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत.याची विशेष दक्षता घेण्याची सूचना अमित बोरसे यांनी केली.महाविद्यालय चे माजी विथ्यार्थी चे संघटन करून ,माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्याचां महत्वपूर्ण निर्णय या सहविचार सभेत घेण्यात आला. या संघटन शक्तीतून महाविद्यालय विकासावर भर देण्यात यावा असे सूचित करण्यात आले.सदर सहविचार सभेस अध्यक्ष शरद पाटील,डॉ.प्रवीण निकम,विजय चोपडा,बाळासाहेब कवडे.अरविंद पाटील, रांमनिवास करवा ,संजय आहेर,यांचे सह विविध विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते
