
नाशिक (प्रतिनिधी) नाशिकअखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखेची २०२५ ची नाशिक जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. प्रशांत भरवीरकर, कार्याध्यक्षपदी प्रा.हेमंत चोपडे तर उपाध्यक्षपदी कवी किरण भावसार यांची निवड करण्यात आली. या वर्षात अनेक नवीन उपक्रम घेण्याचा तसेच नवनवीन लेखक, कवी, साहित्यिक यांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा व पुस्तक प्रकाशन, पुस्तक चर्चा, काव्यवाचन, परिसंवाद, व्याख्याने घेण्याचा मानस अध्यक्ष डॉ. भरवीरकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी आरती शिरवाडकर, संघटन मंत्री म्हणून प्रा. संजय साळवे, प्रसिध्दी प्रमुख पद्माकर देशपांडे, मधुरा गोरे, मार्गदर्शक मिलिंद कुलकर्णी, ऋता पंडित तर कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय गोराडे (नाशिक), विनायक मोरे (विंचूर, निफाड), धीरज देशमुख (नाशिक), प्रा.डॉ. सागर चौधरी (नाशिक), मकरंद फडके (नाशिक), सौरभ रत्नपारखी (नाशिक), ऍड. भूषण जाजू (ओझर), निकेत ठाकूर (नाशिक), सचिन नवघिरे (ओझर), हर्षल भट (नाशिक), चेतन भोसले (सारोळे, निफाड), स्वप्नील कुलकर्णी (ओझर), ज्ञानेश पिसे (नांदगाव), ऍड.ज्ञानेश गुळवे (इगतपुरी), तुषार देसले(मालेगाव), लक्ष्मण बागुल (बोरगाव, सुरगाणा), सु.द. जाधव (नाशिक), कृष्णा बोराडे (भगूर, नाशिक), हेमंत रतन बागुल (विंचुर, निफाड) महिला सदस्य म्हणून मनिषा दिघे (नाशिक), रेश्मा गडकरी-देशमुख (निफाड), गायत्री देशपांडे-पाठक (दिंडोरी), प्रियांका खैरनार (सटाणा), ज्योती चौधरी (नाशिक), अंजली रहाणे (नाशिक), पूर्वा पाळंदे (नाशिकरोड) यांची निवड करण्यात आली.नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत साहित्य भारतीचे महामंत्री प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री अरुण ठोके यांनी केले.
