
नाशिक (प्रतिनिधी) :.तरल स्वरांचे माधुर्य , स्वरांची लय व उपजत अभिजात स्वर यांचे गोंदण घेऊन सुर विश्वास ची मैफल उत्तम.रंगली. यातून ईश्वर भक्तीची आस उपस्थितांनी अनुभवलीनव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते भक्ती नांदुर्डीकर यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले. वैष्णवी भडकमकर , (तबला), अभिजीत भटजिरे (संवादिनी) यांची त्यांना साथसंगत केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले.मैफिलीचे हे 49 वें पुष्प होते विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील राग अहिर भैरव याच्या विविध अंगांना साजेसं आणि प्रभावी सादरीकरण रसिकांना अनुभवायला मिळालं. बडाख्यालपासून ते अभंग पर्यंतच्या रचनांनी श्रोत्यांना भक्तिरस, सौंदर्य आणि अध्यात्माच्या गुंफणीत गुंतवून ठेवलं.मैफलीची सुरुवात “हो करतार” या बडाख्याल रचनेने झाली. या बंदिशीच्या गंभीर आणि रसपूर्ण राग अहिर भैरवच्या गहिऱ्या स्वरांनी समर्पक साथ दिली. आलाप व तानांच्या प्रयोगातून भक्ती यांनी रसिकांना ध्यानात्मक अनुभव दिला.यानंतर सादर झालेल्या “भोर भयी बन” या छोट्या ख्यालाने सकाळच्या प्रसन्नतेचे चित्र आपल्या सुरावटींतून रेखाटले. लयबद्धता आणि बंदिशीचा अर्थ यांचे सुरेख संतुलन या सादरीकरणात होते.सोहम हर डमरू बाजे” ह्या नाट्यगीतने भगवान शंकराच्या तांडवसृष्टीचे दर्शन घडवणाऱ्या या गीताने नाट्यमयता आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधला.कार्यक्रमाचा समारोप “पदमनाभा नारायणा” या अभंगाने झाला. रागाच्या अभंगाचा साधेपणा आणि भक्तिभाव यामुळे ही रचना अंतर्मुख करणारी ठरली.या चारही रचनांतून राग अहिर भैरवची विविध रूपं साकारली गेली कधी गंभीर आणि ध्यानात्मक, तर कधी जलद आणि लयबद्ध. एकंदर मैफलीचा अनुभव रसिकांसाठी आध्यात्मिक ठरला.कलावंतांचा सन्मान शौर्य संगीत.अकादमीच्या सुमित्रा पाटोळे ,चित्रकार, सुहास जोशी,अमेय दीक्षित,यांचे हस्ते करण्यात आला.

गायिका मधुरा बेळे केतन इनामदार यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी विश्वास ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ मनोज शिंपी उपस्थित होते.
