
अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’ बहुचर्चित कादंबरी अलीकडे पोस्टाद्वारे घरी आली आणि हाती पडताच अगदी दोन दिवसात अगदी झपाटल्या सारखं “गोंडर” या आपल्या कलाकृतीवर अक्षरशः तुटून पडल्यासारखं वाटलं मला… एखाद्या भुकेल्या जीवाला भाकर मिळाल्यावर त्याचं पोट भरत, त्यावेळची त्याची जी मन तृप्ती असते, ती कोणत्याही शब्दांत बांधण कठीणच.. अशीच अवस्था आज मला माझी वाटली.गोंडर मला हातात आले त्यादिवसाला आज काही दिवस होऊन गेले, पण काही कारणास्तव पूर्ण वाचन करता आलं नव्हतं… आणि अर्धवट वाचन झालेल्या गोंडर ने मनात बराच धुमाकूळ मांडून ठेवला होता. कधी एकदा कादंबरी वाचतेय असं व्हायचं… जरास रिलॅक्स झाले या दिवसांत आणि हे अपूर्ण राहिलेलं काम कालपासून पुन्हा आधीपासून वाचन करत पूर्ण केलं… कारण, रोज यशवंत समोर यायचाच यायचा… कधीही कुठे अन्यायाविरुद्ध आवाज होतांना दिसला तर त्यात यशवंतच दिसला मला… यशवंत चं बालपण, किशोरवस्था आणि त्याचा प्रवास… अगदी काळजाला भिडणारा आहे… कोणकोणत्या प्रसंगाला तो कसा रिऍक्ट व्हायचा… त्याच्या बालपणापासून त्याच्या मनावर वेळोवेळी होतं आलेले आघात आणि त्याच्या विरोधात लढण्याची वाढत गेलेली जिद्द चिकाटी… प्रत्येकाला उभारी देते.. मला खरंतर नाव वाचलं तेव्हा गोंडर हा प्रकार खरंच माहिती नव्हता.. असं वाटलेलं एखाद्या गावाचं नाव असेल का, किंवा मग यातील एखाद पात्र असेल का… उत्सुकता होती खूप जाणून घेण्याची, पण जेव्हा वामनपुत्र यशवंतला “गोंडर ” मिळालं,तेव्हा गोंडर चा खरा अर्थ समजला. ते पाहून कोणाच्या डोळयांत पाणी ना उतरावं तर नवलंच… सोबत राग आणि रागाने तडफडत ही लढाई पार करण्याचा त्याचा दृढनिश्चय या समाज व्यवस्थेला कुठेतरी बदलून टाकणार नक्कीच ही आशा पल्लवीत झाली… जाती व्यवस्था समाज व्यवस्था ही लोकांचा कारभार, कामाचे स्वरूप यावर जरी ठरली असेल तरीही यात समाजाचं भलं कधीच होऊ शकत नाही.. कारण ही व्यवस्था फक्त दलित, वंचित माणसाला कायम पायरी खालीच ठेवते.आताशा यात बदल होतांना दिसतो खरा, पण म्हणावा तितका बदल नाहीच… पण गोंडर मधून तुम्ही या व्यवस्थेला हाणून पाडणारा नायक यशवंत उभा केलात, त्याच्यावरचा *फुले शाहू आंबेडकर* यांच्या विचारांचा पगडा दाखवलात आणि त्याच्या प्रत्येक हालचालीतून या विचारांचा प्रभाव उघड उघड दिसतो… जातीव्यवस्था समाजव्यवस्था फोडून या विरुद्ध आवाज उठवत निर्णय घेण्याची ताकद यशवंतला शिक्षण घेतल्यामुळे मिळाली… ही शिक्षणाची ताकद 🙏 डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे ” शिक्षण हे वाघिणीच दुध आहे, हे दुध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही..” हे अगदी साध्य झालं… त्याचं प्रमाणे बाबासाहेबांचा अजून एक विचार यशवंतने आत्मसात केला, “तुचं आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…” यशवंतने स्वतःला घडवलं, सोबत उमाच्या विचारांना बदलून तिलाही अन्याया विरुद्ध लढ्याच्या प्रवाहात आणलं..वामन, यशवंत ची आई, उमा…. पाटील… यांनाही रेखाटण्यात तुम्ही कसली कसर सोडली नाही. एकच व्यक्ती एवढं व्यक्त होऊ शकते.. इतक्या पात्रांना न्याय देऊ शकते… हे तुम्ही खरंच सिद्ध केलंत… मनापासून नमन करते आपल्या लेखणीला आपल्या विचारांना…🙏🙏 तुमची लेखणी अशीच बहरत राहो.. गोंडर अगदी देशाबाहेर सुद्धा पोहोचली, प्रसिद्ध झाली.. यांचप्रमाणे खूप खूप साहित्य आपल्या हातून घडावं आणि यशाच्या शिखरावर पोहचावं या शुभेच्छासहित निरोप घेते… आणि खुप खुप धन्यवाद आपल्यामुळे ही अविस्मरणीय शब्दकृती…
गोंडर कादंबरी माझ्या वाचनात आली.-अश्विनी पटेकर / पुणे
