
नांदगाव-(प्रतिनिधी )राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी रिपब्लिकन चळवळीतील तरुण,तडफदार, उमदे नेतृत्व कपिल तेलुरे यांची निवड करण्यात आली. त्यांची नियुक्ती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू असून चळवळीतील अनेक जुने जाणते नेते- कार्यकर्ते – युवक -युवती -सामाजिक कार्यकर्ते- महिला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील रिपब्लिकन पक्षालाअसलेले गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते /पदाधिकारी /कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अधिक मजबुतीने उभा रहावा यासाठी मेहनत परिश्रम घेत आहे. म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते कार्यकर्ते प्रवेश करीत आहे

.कपिल तेलुरे रिपब्लिकन चळवळीतील एक अभ्यासू सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असे नेते आहे, नाशिक जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला अधिकच बळ प्राप्त होईल असा विश्वास आहे. कपिल तेलुरे यांच्या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतील अनेक नेते कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा येत आहेत.लवकर समस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा देखील आयोजित करणार असल्याचेही आपल्या निवडीनंतर कपिल तेलुरे यांनी बोलतांना सांगितले.
